h2e महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा - ९ वर्षाखालील गट (दिवस दुसरा)

महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेने तसेच सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन व द हेरिटेजच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने आयोजित केलेल्या “चॅम्पियन चषक” ९ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू मुंबईचा नोवा आय्यर, रायगडचा धीमन हेमांग, पुण्याचे हेयान रेड्डी, अनिश जवळकर, ठाण्याचा कथित शेलार, नागपूरचा रिधान अग्रवाल तसेच मुलींच्या गटात मुंबईची गिरीश पै, सन्मरी पॉल, पुण्याचे अदिना मोहंती, अन्वी हिंगे सोलापूरची पृथा ठोंबरे, नंदुरबारची भूमी ढगढाके या आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूंनी आकर्षक खेळत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत यजमान सोलापूरसह मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली, लातूर, अमरावती, पालघर, छ. संभाजीनगर आदी राज्यातील विविध जिल्ह्यातुन ३६ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडूसह एकूण २०२ नामांकित खेळाडूंनी विक्रमी सहभाग नोंदवला.